असा जोडीदार हवा आहे…


जिवाला जीव लावणारा

साथीदार असा हवा,

मला माझ्या स्वप्नातील 

राजकुमार तसा हवा...


क्यूट बिट नको जास्त 

फक्त प्रामाणिक हवा,

मला माझ्या स्वप्नातील 

राजकुमार असा हवा..


चॉकलेट, भेटवस्तू , नुसताच

प्रेमाचा वर्षाव नको मला, 

मनाने दिलदार असणारा

जोडीदार असा हवा...


झाली भांडणं कितीही 

आले प्रसंग कठोर, 

प्रत्येक परिस्थितीत साथ 

देणार मला जोडीदार हवा..


नसतील भरपुर पैसे 

संसार थाटायला जरी, 

जगातील सुंदर कपल 

आम्ही होऊन दाखवू तरी...


आदर असावा नात्यात 

विश्वास असावा घट्ट, 

ऐकमेकांनीच ऐकमेकांचे 

पुरवावेत लाडाने हट्ट..


बंगला गाडी नको

नको रईसी मला,

न बोलताच भावना जाणणारा 

जोडीदार हवा आहे...


कितीही मोठा झाला जरी 

असले मोठ्यांसोबत उठणे-बसणे 

तरी 

तरी, संस्कारांना जपणारा असा 

एक जोडीदार हवा आहे..

असाच माझ्या स्वप्नातील 

मज जोडीदार हवा आहे..


- कु. पायल काळे

 जवराबोडी, जिल्हा चंद्रपूर