‘ती’च्या नजरेतून असे काही…

 


    आज मी लिहितेय कारण मला गप्प बसणं आता जमत नाही, माझा मौन म्हणजे माझी कमजोरी नाही. जो आपल्या सोबत जसा वागतो, त्याला तसे उत्तर दिले तरंच तो जागेवर येतो, हे व्यावहारिक जीवनात अनेकदा पहायला मिळते. काही लोकांना इतर कुणाचीच प्रगती पाहावीसी वाटत नाही किंवा ते त्यांना खपत नाही आणि म्हणूनच असे लोकं दुसऱ्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. ही मनातील नकारात्मकता म्हणा किंवा स्व: अनुभवाचे कथन म्हणले तरी काही वावगं ठरणार नाही. शांत बसलं तर लोकं आपल्याला विकून खायला सुध्दा कमी करणार नाहीत, हा माझा अनुभव. एक मुलगी म्हणून सुखदुःख दोन्ही समान पद्धतीने वाट्याला आले असे मी म्हणेल. दृष्टिकोनाचा फरक आहे. ज्याच्या मनी जो विचार त्याला पुढे जग तसे दिसे. नेहमीच आईबाबांचे खूप प्रेम मिळाले, लहानपणापासूनच अगदी मनापासून. शाळेतही हुशार विद्यार्थीनी होते तर सर्व शिक्षक गुरुजन वर्गाचा नेहमीच सकारात्मक मार्गदर्शन प्रतिसाद मिळाला. मुलगी म्हणजे घरची लक्ष्मीअशी घरुन वागणूक मिळाली. यासोबतच दुःखाची बाब ही की, जेव्हा मी डिग्री पास झाल्यानंतर दीड वर्षे घरी होते, तेव्हा मला जाणवलं की, मुलगी कितीही लाडकी गुणाची असली तरी ती कळतनकळत घरच्यांसाठी ओझं बनतेच. जॉब करत नाही, काही कमवत नाही, मग लग्नाचा विचार येतोच. समाज काय म्हणेल? हिला किती दिवस अजून असंच इथे ठेवायचं? त्यांच्याही मनात विचार येतच असतील. त्यात शेजारी नातेवाईक आगीत तेल ओतायला. दुसऱ्यांच्या घरात आग लावून त्यात आपले हात शेकून घेण्याची कला यांनाच माहीत असते. आईबाबा कितीही आपले असले आणि आपण कितीही लाडाच्या मैना असोत, शेवटी एका टप्प्यानंतर आपोआप इतरांसाठी ओझे बनतच जातो. म्हणूनच, पोरींनो! चांगले शिक्षण घ्या, शिक्षण करिअर च्या बाबतीत कधीच compromise करू नका, तेच तुमचं भविष्य आहे. काही तरी कमवा, कमाई छोटी असली तरी चालेल पण स्वतः कमवा. Financially independent व्हा. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. तुमच्यासाठी आभाळातून कुणी पडणार नाही, तुम्हालाच कणखर होऊन आपली लढाई लढायची आहे. तुमचे कुणाला काहीच पडलेले नसते, Emotional fool बनू नका. Emotionally, mentally strong बना. नवीन गोष्टी शिका. बाहेर समाजातल्या सद्यस्थितीचा आढावा घ्या. बघा, शिका, विचार करा, शहाण्या व्हा. तुमची बाह्य सुंदरता कुठपर्यंत तुम्हाला साथ देईल तुम्हीच विचार करा. अरे! इथे लाखोंकरोडो पडल्यात तुमच्यापेक्षा सुंदर आणि देखण्या! स्वतःला कमी समजू नका, न्यूनगंड ठेवू नका आणि मीच सर्व काही, जणू स्वर्गातली अप्सरा असेही समजू नका. दुसऱ्यांसाठी कितीही चूल आणि मूल सांभाळलं तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःला किंमत देत नाहीत तोपर्यंत, सख्खे लोकं सुध्दा तुम्हाला किंमत देत नाहीत

    ये दुनिया पैसे की दिवानी हैलक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या पैशावर ऐश करू नका. स्वतः कमवा आणि अभिमानाने स्वतःच्या जीवावर आनंद घ्या. एकाएका रुपयासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं तेव्हा त्या भावना काय असतात या मी अनुभवल्या आहेत. त्यामुळे पोरींनो, लाजिरवाणे जीवन जगण्यापेक्षा अभिमानाने जगा. या लोकांना तुमचं काही पडलेलं नसतं, खरंच, यांना तुमचं काही घेणं- देणं नाही, ते फक्त तुमच्यावर comments करणार, बॉडी शेमींग करणार, टाँट मारणार, तुम्हाला नाना तऱ्हेने जज करणार, या पलीकडे त्यांची लायकीच काय आहे तुमच्या आयुष्याबद्दल काही बोलायला? असल्या लोकांना कधीच too much serious घेवू नका. तुमचा संघर्ष, तुमचा प्रवास कुणालाच माहीत नसतो. चार दिवसांपासून भेटलेले हे लोक काय म्हणून तुम्हाला जज करतात आणि तुम्ही लोकांवर Depend पोरी तेच धरुन बसतात. हट्! गेले उडत असे लोकं, वाऱ्यावर सोडून द्या त्यांना! Feminism ची खरी ताकद ओळखा. फक्त दर महिन्याला पाळीचा त्रास सहन करणे आणि दुसऱ्या जीवाला जन्म देणे हे feminism नाही. एका Community ला एकत्र कसे धरुन ठेवायचे हे स्त्रीला चांगल्या प्रकारे माहित असतेएक बाई जितक्या गोष्टी सोबत हॅन्डल करते आणि सहन करते, तेवढे Multi-tasking पुरुष नसतात. पुरुषांना कमीपणा दाखवणे हा माझा हेतू नाही, त्यांची किंमत आपल्या समानच आहे. शेवटी आपण एकमेकांचे आधार आहोत. त्यांना आपली गरज असते आणि आपल्यालाही त्यांची. यावरून आठवलं, मी काल सहजच एक लेख वाचत होते. तो माझ्या शब्दांत जरा समजावते आणि त्यातून माझ्या मनात काही विचार आले

कोर्टात कागदावर शेवटची सही झाली आणि वकील हसून म्हणाले, “घ्या मॅडम झाला तुमचा घटस्फोट, कोर्टानं तुम्हाला ४५ लाख रुपये आणि नुकसान भरपाई दिली आणि दर महा खर्चासाठी १५ हजार रुपये देण्यात येतील, आता खूश ना?” 

नेहा स्मित हास्य करत म्हणाली, “हो, खूश आहेआता मला कुणाकडून काही नको.”

बाजूलाच तिचा पती शैलेश शांतपणे सगळं दुश्य पाहत होता. नेहाने नजर वर करुनही त्याच्याकडे पाहिलं नाही आणि ती तशीच गेली. गाडीचा दरवाजा धाडकन बंद केला आणि नात्याचाही

आपल्या आईबाबांसोबत माहेरी आली. नेहाला वाटलं हेच खरं स्वतंत्र आणि हीच मोकळीक. आईबाबाच्या घरी माहेरी राहू लागली

पहिला महिनासगळे तिच्याशी प्रेमाने वागायचे, काळजी करू नकोस म्हणायचे, तिला वाटलं तिचा निर्णय योग्यच होता.

दुसरा महिनाघरातले वातावरण हळू हळू बदलायला लागले. भाऊवहिनी मनाला वाटेल ते बोलू लागले, भाचे म्हणू लागले, “ आत्या तू तुझ्या घरी कधी जाणार?”

तिसरा महिनाआई -बाबाही बोलू लागले, “ तुझी जबाबदारी तू घे, आता जरा मोठी हो…” 

चौथा महिनासर्वजण नेहावर लक्ष ठेवू लागले, बाहेर गेली तर शेजारी कुजबूज करू लागले, “ घटस्फोट झालाय, ही कायम इथेच राहणार का?” तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न करू लागले

पाचवा महिनानेहाला सारखी सारखी शैलेशची आणि सासरची आठवण येवू लागली, छोटेछोटे भांडणं, त्याच्या सवयी, त्याच्याशी रुसणं, तरी त्याचं प्रेमाने जवळ घेणं सगळं आठवू लागले

एके रात्री गच्चीवर बसलेली असताना आभाळाकडे पाहता पाहता मोठ्या हिंमतीने तीने फोन उचलला आणि शैलेशला फोन लावला, हात थरथरत होते आणि भित्र्या आवाजात ती बोलू लागली, “हॅलो,.. शैलेशआपण आपल्या नात्याला दुसरी संधी देवू शकतो का? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय.. मला तुझी खुप आठवण येते..” दोन्ही बाजूंनी थोडा वेळ शांतता पसरली होतीशैलेश बोलला, “नेहा मीपण तुझ्याशिवाय नाही जगू शकत..”

नेहाच्या गालावर आसवे टपकत होती, तिला तिच्या चुकीची जाणीव झाली. आपण रागात घेतलेल्या निर्णयाचा तिला पश्र्चाताप झाला

भर थंडीत रात्री १२ वाजता शैलेश कार घेऊन नेहाला आणायला निघाला. थांबला, दमला. अवघ्यातासांच्या प्रवासानंतर तो नेहाच्या माहेरी तिला घेण्यासाठी पोहोचला. सकाळी तो नेहाच्या आईबाबाच्या घराच्या दरवाजाबाहेर उभा होता. तिच्या बाबांनी दार उघडले, नेहा घाबरलेली, लाजलेली.. पण तिला दिलासा मिळाला होता. दोघांनी आईबाबांना नमस्कार केला, बॅग घेऊन ती शैलेश सोबत आपल्या घराच्या दिशेने निघाली. तिच्या खऱ्या घराकडे. भांडता, चिडता. त्या दोघांनी हा निर्णय मनापासून घेतला होता

नेहाला कळून चुकले होते की, मन तुटल्यावर खरी गरज ही आपल्या माणसाची असते, आपल्या हक्काच्या माणसाची, आपल्या जीवनसाथीची. समाज फक्त आपल्याला जज करतो आणि माहेरी आपण फक्त पाहुणी असतो

यावरून असं वाटतं, रागात घेतलेला कोणताही निर्णय खरंच योग्य असतो का? आपण त्याच्या परिणामाचा विचार करतो का? कधी कधी दोन क्षण थांबून विसावा घेऊन आयुष्याचे निर्णय घ्यावेत, आपल्या सोबतच अनेकांचे आयुष्य वाचेल. घटनेच्या दोन्हीं बाजूंनी विचार करायला शिका. तुमचा इगो, अहंकार बाजूला ठेवून कधी समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय हे पण समजावून घेता आलं पाहिजे. कोणत्याही नात्यात गरज असते ती स्पष्ट संभाषणाची, एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांच्याविश्वासाची. तुम्हाला स्वतःवर इतका विश्वास पाहिजे की, माझी निवड कधीच चुकीची असू शकणार नाही. जर तो मुलगा/ती मुलगी (पती/ पत्नी किंवा समोरचा व्यक्ती जो कुणी असेल) खरंच इतकाच वाईट असेल तर मी त्याला निवडलेच कसे काय? कुणाला वाटत नाही की, वाईट किंवा चुकीचा माणूस माझ्या आयुष्यात असावा, चांगला, समजूतदार माणूसच आपल्याला हवा असतो ना! त्याच्या चांगल्या गोष्टी पाहूनच आपल्याला तो/ती आवडला/आवडली असेल ना! तर एखादी गोष्ट वाईट किंवा चुकीची बोलला म्हणजे लगेचच नातं तोडणं असतं का? कधी असा प्रसंग आला तर त्या समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी किती प्रयत्न केले असतील ते आठवा. तो ही आपल्यामुळे कधी दुखावला असेल, आपल्यामुळे रडला असेल म्हणजे तो पण आपल्यासोबत असंच वागला का नाही ना! एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी ९९ गोष्टी चांगल्या केल्या अन् एखादी गोष्ट वाईट झाली तर आपण ९९ चांगल्या गोष्टी पाहत नाहीत ती एकच वाईट गोष्ट धरुन बसतो. हा आपापल्या परिपक्वतेचा भाग आहे. मुलं खुप साधे असतात, त्यांना मुलींसारखं गोष्टी फिरवून बोलणं, कोड्यात बोलणं नाही समजत, खरंच नाही समजत. आपल्या नवऱ्याला (partner) ला direct सांगा, मला हे पाहिजे असं पाहिजे ते लगेच आणून देतील; पण आपण जर अट्टाहास करत बसलो, रागवत चिडत बसलो तर साध्या गोष्टी पण बिघडून जातात. त्यांना पण मन आहे, भावना आहेत थोडं त्यांना पण समजून घेत चला. शेवटी काही झालं तरी आपला नवरा आपला असतो. त्याला आपल्या बायकोच्या आधाराची खूप गरज असते. आईनंतर तो मोठा झाल्यावर बायको पाशीच रडू शकतो. आपल्या समाजाने मुलांवर पडदे घातलेत, त्यांनी रडू नये कारण त्यांना दुबळे समजतील, अरे का? का पण? हो मान्य आहे, चार चौघात नका मोकळं होवू, पण at least आपल्या हक्काच्या व्यक्तिसमोर तरी मन हलकं करा. पोरींनो आपल्यात माया, प्रेमभाव भरपूर असतो, किंबहुना आपले हॉर्मोन्स तसे आहेत. आपल्या साथीदाराला एवढा space द्या की तो घाबरता, कसले दडपण घेता, जज होता व्यक्त होईल. तुमचं feminism म्हणजे सगळीकडे equality चे नारे लावणे एवढच नाही बाळांनो. सर्व गोष्टी समजून घेवून एक कणखर स्त्रीत्व दाखवणं पण आहे. एखादी गोष्ट चुकली, समजली नाही, घाबरु नका सर्वांकडून चुका होतात अजिबात घाबरु नका, पुन्हा फोकस करा, पुढे जा आणि मनात स्वार्थ, अहंकार या भावना येवू देवू नका. सगळे तुमचेच आहे बाळांनो! आपण प्रकृती मातेच्या अंश आहोत. एका नवीन जीवाची सुरुवात करण्याची ऊर्जा आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. निरोगी आहार, व्यायाम, विचारांवर नियंत्रण, personal आणि professional life balance करणं हे सर्व करता करता स्व: अस्तित्व शोधा. नवीन चार गोष्टी पहा, अनुभव घ्या. शेजारच्या जोशी काकू अन् बंटीच्या मम्मी काय बोलतील याचा विचार करु नका. मोकळ्या व्हा, स्वतःला व्यक्त होवू द्या. आपली आवड जपून ठेवा. आवड असल्यावर सवड आपोआप मिळते. समाजातल्या भुरट्या लोकांना तुमचा प्रवास, तुमची मेहनत माहीत नसते, त्यांच्यावर लक्ष देवून रस्ता भटकू नका. तुम्ही किती रात्री जागून इथपर्यंत आलात, त्यांना explain करत बसू नका. तुमचे स्वप्न, तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्यापाशी ठेवा, त्याचा दिखावा करत फिरु नका किंवा मीच खूप महान अन् गुणाची असला फालतूपणा सुध्दा करू नका

    एका बाईला जेवढी एका पुरुषापासून हानी नसते तेवढी एका बाईपासून असते. एका स्त्रीला दुसरी स्त्री कधीच खपत नाही आणि म्हणूनच आज आपण मागे आहोत अन् आपल्याला असे वेगवेगळे दिन साजरे करण्याची वेळ येतेय. हो, स्त्री कर्तृत्वाला प्रेरणा मिळते, कामाला उजाळा मिळतो नक्कीच! पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या कामी आली तर हे jealousy सारखे प्रकार कमी होतील. अमकिनं संक्रांतीला सोनं केलं म्हणून मीपण नवऱ्याकडे सोनं खरेदी करण्याचा हट्ट करणार अन् रुसुनफुगून बसणार, कसली गं ही तुमची समजूतदारी? मी तर पाहिलंय, काही मुली लग्न धूमधाम करावं म्हणून अक्षरशः बापाला कर्ज काढायला भाग पाडतात. फक्त लोकांना दाखवण्यासाठी बरका! लग्नात थाटमाटात पाची पक्वणाचं जेवण, मोठा हॉल, संगीत, मेहंदी, हळद, फेरे विधी, डेकोरेशन, भांडी, महागड्या वस्तू, डिजेचा खर्च बाजूला बापरे!! ते कर्ज फेडता फेडता त्या वधूपित्याच्या नाकी नऊ येतात. अरे काय हा प्रकार? पोरींनो हा असला दिखावा करताय कुणासाठी? जे लोकं तुमच्या तेलातुपातल्या जेवणालाही नावं ठेवतात त्यांच्यासाठी? की social media च्या दिखव्यासाठी? करायचाच असेल तर quality संसार करून दाखवा ना! आपल्या आई- बाबांना कर्ज काढून लग्न करावं लागेल अशी नौबत येत असेल तर त्या सासर घराला काय पुढे नेणार तुम्ही? आपल्या आईबाबाला कर्ज काढायची वेळ येवू देवू नका. आपल्या शिक्षणासाठी अगोदरच लाखों रुपये खर्च झालेत त्याची तरी जाणीव असूद्या. माझ्या छकुलीला हा ड्रेस पाहिजे, ही चप्पल पाहिजे, फॅशनच्या दुनियेत जगायला तुम्ही किती पैसे खर्च करता जरा हिशोब ठेवत जा. तुम्हालाही हौस करू वाटते ना! फॅशनची जर आवड असली तर professional कोर्स करा त्यातून कमाई करा, पण फक्त दिखाव्यासाठी खर्च टाळा गं बाळांनो. स्वतः कमवत्या व्हा, स्वतः पायावर उभ्या राहा. आईबाबांवर कधीच ओझं होवू नका. त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवा आणि कधीच कुणाचा विश्वास तोडू नका. एखादा तुमच्यासोबत चुकीचा वागला त्याला दुसरी संधी देवून पाहा पण direct अंतिम टोकाचा निर्णय घेवू नका. जगासोबत स्वतःकडे लक्ष द्या. एकच आयुष्य आहे मनभरून जगा आणि दुसऱ्यांनाही जगूद्या. कामाच्या ठिकाणी अन्याय होतोय शांत बसू नका, आवाज उठवा, कुणी चुकीचं वागतोय, त्याला कडे बोल ऐकवा, तो बरोबर जागेवर येतो. स्वतःसाठी उभ्या राहायला शिका. स्वतःसाठी लढा. मदतीची गरज आहे, जा लोकांना म्हणा, दोन वेळा, चार वेळा बोला, जा, जॉब हवाय सांगा, मदत करणारे लोक आहेत इथे, पण तुम्ही सुरुवात करा, काहीतरी हातपाय हलवा. अबला बनून एका कोपऱ्यात बसू नका. तुमच्यासाठी कुणीच येणार नाही. फार तर तुमचे आप्तेष्ट तुम्हाला कुठपर्यंत मदत करतील? समजा, तुमचा पेपर आहे, तुम्हाला पेन देतील, हॉल तिकीट देतील, हवं तर केंद्रापर्यंत सोडून येतील, आत नेवून बसवतील; परंतु शेवटी पेपर तुमचा आहे आणि तो फक्त तुम्हालाच सोडावा लागेल. 

    बाळांनो, आयुष्यात धीर सोडू नका, संयम ठेवा, आता सगळं संपलंय असं वाटत असेल, रस्ता दिसेनासा होत असेल ना! एक वहीपेन घ्या, आत्ता पर्यंत काय केलंय आणि तुमच्याकडे आत्ता काय आहे लिहा, सर्व लिहा, डायरी गच्च झाली तरी चालेल, लिहा, स्वतःला वेळ द्या, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडतील. लेकरांनो फक्त खचून जावू नका. मला सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट पाहिल्यावर खरचं ताकद मिळते. कणखर बना, लोकांनी बाहेरुन कितीही तुम्हाला तोडू द्या, मात्र आतून तुटून जावू नका. मला छावा चित्रपटातील कविता नेहमी प्रेरणा देते-

मन के जीते जीत है, मन के हारे हार,

 हार गये जो बिन लढे, उनपर है धिक्कार

उनपर है धिक्कार जो देखेना सपना,

सपनों का अधिकार असल अधिकार है अपना…”


-अनुराधा नवनाथ कराळे
  पाथर्डी, अहिल्यानगर
  ई-मेल: anuradhakarale010@gmail.com