जन्माला आली आहेस,
थोडी जगून तर बघ..!
जीवनात संकटं खूप आहेत,
जरा लढून तर बघ..!!
चिमूटभर त्रासाने कोसळू नकोस,
जरा कणखर होऊन तर बघ..!
यशाने उंच उडण्या अगोदर,
जरा अपयशाचे चटके सोसून तर बघ..!!
डाव मांडणं सोप्पं असतं,
जरा रिंगणात उतरून तर बघ..!
घरटं पाडणं सोप्पं असतं,
जरा काडीने विणवून तर बघ..!!
जगणं कठीण मरणं सोप्पं असतं,
त्या वेदना झेलून तर बघ..!
जन्म- मृत्यू एक कोडं असतं,
जाता जाता एवढं सोडून तर बघ..!!
बस्स झालं सहन करणं,
जरा आवाज चढवून तर बघ..!
नको ते उसने शब्द,
जरा स्वाभिमानी होऊन तर बघ..!!
आणि शेवटी..
हे जग तुला अजून समजायचं आहे,
थोडं जगून तर बघ..!
जाता– जाता नक्की एकदा,
आयुष्याची परीक्षा देऊन तर बघ…
-अनुराधा नवनाथ कराळे
