विचारधन १



स्त्रियांची प्रतिभा जितकी फुलेल, त्यांच्या अंत:शक्ती (Potentialities) जितक्या साकार होतील, तितके मानवजातीचेच कल्याण होईल. कारण, निम्मी मानवजात स्त्रियांनी बनलेली आहे. त्यांची कार्यक्षमता व सर्जनशीलता मारून टाकणे याचा अर्थ केवळ स्त्रियांची हानी करणे असा नसून एकूण मानवजातीचीच ५० टक्के कार्यक्षमता व सर्जनशीलता मारून टाकणे होय. स्त्रियांची गुणवत्ता वाढली तर त्याचा फायदा पुरुषांनाही होईल आणि त्यांची गुणवत्ता गंजत पडली तर त्यामुळे पुरुषांचीही हानी होईलच. तात्पर्य, स्त्रियांची सर्जनशीलता केवळ अपत्य निर्मिती पुरतीच मर्यादित न ठेवता जीवनाच्या विविध क्षेत्रात तिला कर्तृत्वाची उंच शिखरे गाठण्याची संधी देणे, हे एकूण मानवजातीच्या दृष्टीने अत्यंत हिताचे आहे.

( संदर्भ : हिंदू संस्कृती आणि स्त्री, आ. ह. साळुंखे, पेज. नं. १५५)