ताई तुमचं चुकलंच
रिंगणाबाहेर जायला सांगितलं
एक रिंगण तोडू बाई
दोन रिंगण तोडू
आमचं एक रिंगण
काचेचं की मातीचं
रिंगणाबाहेर जायला सांगितलं
एक रिंगण तोडू बाई
दोन रिंगण तोडू
आमचं एक रिंगण
काचेचं की मातीचं
त्यात आम्ही फेर धरुन नाचतो,
गरागरा फिरतो
अगदी भोवळ येईस्तो
भोवळ कशाची तेही कळत नाही
रिंगण कुणाचं त्याचंही भान नाही
पण आम्ही नाचणार
नाचणारे कोण कुणास ठाऊक ?
आम्हाला सोयर सुतक नाही
आमचं रिंगण सुटत नाही।।
आखून दिलेलं रिंगण आमचं
नाच गं घुमा-
कशी मी नाचू म्हणायचं नाही
अरे ला कारे करायचं नाही
पायाची नजर डोळ्याला नाही
आमचा रिंगण सुटत नाही।।
घागरी फुंकणं आमचं काम
फु बाई फु फुगडी ss
दमलास काय माझ्या गोविंदा तू!
गोविंदा काही दमत नाही
आमचं रिंगण सुटत नाही।।
हळद लागली रिंगण सुटलं
वरातीमागून घोडे आले
झोपाळ्या वाचून झुलायला लागले
त्याचा ताल चुकायचा नाही
आमचं रिंगण सुटायचं नाही।।
सुपातून जात्यात
जात्यातून चाळणीत
चुलीवरील भाकरी करपत नाही
हाताचे चटके संपत नाहीत
बाईच्या जातीला कळतंच नाही
आमचं रिंगण सुटतंच नाही।।
एक सरपण वेचू बाई
दोन सरपण वेचू
वेचता वेचता सरण रचू
बाई मी सरण रचिते
बाई मी रिंगण बांधिते
सरणा भोवती रिंगण बांधू
नाच गं घुमा
कशी मी नाचू ?
दोन सरपण वेचू
वेचता वेचता सरण रचू
बाई मी सरण रचिते
बाई मी रिंगण बांधिते
सरणा भोवती रिंगण बांधू
नाच गं घुमा
कशी मी नाचू ?
- अरुणा दिवेगावकर
.jpg)