हो, मी बोलती झाली - सुरेखा भगत



हो, मी बोलती झाली 
जसे कैक वर्षांनंतर
बंद खिडकी उघडी झाली

हो, मी बोलती झाली
जसे बेशुद्धीनंतर शुद्धीवर आली

हो मी बोलती झाली
जशी मातीची मूर्ती सजीव झाली

हो, मी बोलती झाली
जशी पूर्ण ताकद माझ्या हातात आली

हो, मी बोलती झाली
जशी नव्याने माझी ओळख मलाच झाली

हो, मी बोलती झाली


- सुरेखा भगत
  अमरावती.